विधानपरीषदेचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे सत्कारमूर्ती .!
भद्रावती (ता.प्र.) - विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा द्वारा संचलित स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात दिनांक ११ मार्च,२०२३ रोज शनिवारला दुपारी ३ वाजता महायोगी श्री अरविंद सभागृहात विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे सर्वाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल लक्ष्मणराव गमे यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे सचिव अमन मोरेश्वरराव टेमुर्डे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा येथील माजी आमदार वामनराव चटप, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोकराव जीवतोडे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकारामजी कोंगरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे उपस्थित राहतील. या सोहळ्यास भद्रावती शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे यांनी केले आहे.
