क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात महिला दिन साजरा.!

वणी (वि.प्र.) - येथील सुप्रसिद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय विठ्ठलवाडी वणी येथे काल दि. ०८ मार्च ला जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वाचनालयातील नियमित वाचक करिश्मा जीवतोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहा. ग्रंथपाल शुभम कडू यांनी 'जिथे महिलांच्या हातात सत्ता असते तो देश ते क्षेत्र नेहमीच प्रगतीशील असतो. सत्ता केवळ पुरुषांची असावी असा काहीसा गैरसमज असतो. परंतु स्त्रीच्या हाती सत्ता असली तर ती त्या संधीच सोनच करते व आपल्या क्षेत्रात आणखी आणखी प्रगती करुन आपल्या क्षेत्राला वरच्या स्थानावर नेऊन ठेवते. जिथे स्त्रीला मानच नसेल ते शासन सर्वसमावेशक आहे हे आपण कसे म्हणू शकतो. आई ज्याप्रमाणे कुटूंबाची जोपासना करते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणमध्ये स्त्रीचा फार मोठा हात असतो, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऐश्वर्या गौरकर, सूत्रसंचालन गायत्री जीवतोडे तर उपस्थितांचे आभार श्रुती निखाडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम पल्लवी वैद्य, जिया जीवतोडे, रेवा टोंगे, नम्रता धानोरकर यांनी घेतले. या कार्यक्रमाला वाचनालयातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".