लिशिका बनाईतचे सुयश .!

लिशिका बनाईत मराठी विषयात ९७ गुण घेऊन नागपूर विभागात प्रथम .! मराठीचा झेंडा डौलाने फडकला .!!

नागपूर (वि.प्र.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात एच एस सी परीक्षेच्या निकालात विभागीय शिक्षण मंडळ नागपूर मधून मराठी या विषयात ९७ गुण प्राप्त करून कु. लिशिका हिम्मतराव बनाईत ही विद्यार्थिनी नागपूर विभागातून मराठी विषयात प्रथम आहे.
विभागीय शिक्षण मंडळ पुणे मार्फत जाहीर झालेल्या एचएससीच्या निकालात नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूर येथून मराठी या विषयात ९७ गुण घेऊन कुमारी लिशिका हिम्मतराव बनाईत विद्यार्थिनी प्रथम आली. ही सेंट पाॅल जुनिअर कॉलेज चिकना, पिपळा रोड, हुडकेश्वर, नागपूर या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला प्राध्यापिका पुष्पा राऊत यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
 अभ्यासातील सातत्य राखत चिकाटी , जिद्दीने, मेहनतीने तिने हे यश संपादन केले आहे. मराठी हा विषय तिच्या आवडीचा विषय असल्याने, तिची या विषयात विशेष रुची होती. तिने या विषयात ९७ गुण घेऊन विभागीय शिक्षण मंडळ नागपूर विभागातून मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकाविला. आवांतर वाचनाची आवड हा तिचा छंद असल्याने तिने हे यश संपादन केले.
तिने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे, तिच्या आई-वडिलांचे व तिच्या मार्गदर्शक प्राध्यापिका पुष्पा राऊत मॅडम यांचे मराठी विषय शिक्षक महासंघाचे संस्थापक सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई , संस्थापक कार्याध्यक्ष प्रा संपतराव गर्जे अहमदनगर, उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर , प्रा. पवन कटरे गोंदिया, मुख्य समीक्षक नागपूर विभाग नागपूर, कोषाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे भंडारा, प्रा. डॉ. दिलीप जाधव सांगली, समन्वयक प्रा. डॉ. पांडुरंग कंद पुणे, सहसचिव प्रा. डॉ. स्मिता भुसे नगर, उपाध्यक्ष प्रा. डॉ प्रतिभा बिश्वास मुंबई, सल्लागार प्रा. संजय पाटील, प्रा. डॉ. अंजना खताळ, प्रा.डॉ. विजय हेलवटे, प्रा. अंकुश प्रकाश, प्रा. डॉ. शालिनी तेलगंधे उपाध्यक्ष नागपूर, प्रा. यशवंत पवार, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, प्रा. किशोर वरभे, प्रा. मेघा राऊत, प्रा. डॉ. माया रंभाळे, प्रा. अमित गायधने, प्रा. वरभे मॅडम, प्रा. किंमतकर मॅडम , प्राचार्या विजया मने, प्रा. नामदेव मोरे, प्राचार्य डॉ सुधीर मोते प्रा. जितेंद्र टिचकुले, प्रा. गंगाधर कुनघाटकर तसेच मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य तथा नागपूर विभागातील मराठी विषय शिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. मराठी विषयात नागपूर विभागातून सर्वाधिक गुण घेतल्यामुळे सर्वस्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".