ललिता वानखडे यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार ..!

अमरावतीच्या लेखिका ललिता वानखडे यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार 2023 मुबईमध्ये प्रदान.!

अमरावती (वि.प्र.) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुनिर्मल फाऊंडेशन संस्था यांच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, पत्रकारिता, वैद्यकीय, व्यावसायिक ईत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या नारी शक्तीला महाराष्ट्राची रणरागिणी 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये अमरावतीच्या साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लेखिका व गीतकार ललिता राजू वानखडे यांना हा पुरस्कार मा. डॉ. जगन्नाथराव हेगडे माजी नगरपाल मुंबई, श्रीमती प्राजक्ता अविनाश वाड्ये प्रसिद्ध अभिनेत्री, सौ. स्नेहल आंबेकर महापौर मुंबई, सौ. राजश्री निरज बोहरा अध्यक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, सौ. राज्यश्री चंद्रकांत काळे प्रसिद्ध अभिनेत्री रेतीवाला नवरा पाहिजे सौ. सिद्धी विनायक कामत अभिनेत्री या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनांक १९ मार्च २०२३ ला सकाळी १०:३० वाजता प्रदान करण्यात आला.या आदी ही त्यांना विवश मराठी शाॅर्ट फिल्म साठी बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्ट्रेस पुरस्कार, विवश मराठी शाॅर्ट फिल्म साठी बुलढाणा फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट प्रोड्युसर पुरस्कार, नक्षत्राचं देणं काव्यमंच भोसरी पुणे येथील काव्यमंच आविष्कार 2022 पुरस्कार, 23 वी राज्यस्तरीय काव्यमैफल 2023 पुरस्कार, कला नगरी वेलफेअर सोसायटी अमरावती तर्फे कविरत्न पुरस्कार 2022, कला हिरकणी 2023 पुरस्कार, 5 फेब्रुवारी ला इचलकरंजी येथे राज्यस्तरीय कलारत्न, आणि नुकताच पार पडलेला महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार त्यांना प्रदान झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व विविध क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.