भद्रावती (ता.प्र.) - गुढीपाडवा महाराष्ट्रीयन माणसाचा नववर्ष ! या गुढीपाडव्या निमित्त विदर्भ साहित्य संघ भद्रावतीच्या द्वारे सुमधुर भावगीत व सुगम संगीताची सुश्राव्य मैफील आयोजित केली आहे. पहाट पाडव्या निमित्य या संगीत गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंडित श्री अजितकुमार कडकडे यांच्या शिष्य श्री अमितकुमार लांडगे वर्धा यांच्या सुश्राव्य संगीत मैफिली चा कार्यक्रम गुढीपाडव्या निमित्त भद्रावती शहरात आयोजित केला असून निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती च्या पटांगणात दि. 22/3/23 ला सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे.
भद्रावतीत पहिल्यांदाच असा पहाट पडवा कार्यक्रम होत आहे , तेव्हा समस्त भद्रावतीकरांनी या संगीत पहाट पाडव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघ भद्रावती चे अध्यक्ष डॉ. सुधीर मोते , सचिव डॉ. ज्ञानेश हटवार व समस्त पदाधिकाऱ्यांनी केले आहे.