भद्रावती (ता. प्र.) - सर्वत्र होळीची धामधुम सुरू असताना प्रत्येक गावात वेगवेगळ्या कॉलनीमध्ये होळी साजरी केली जात आहे. भद्रावती येथील साने गुरु जी सोसायटी येथे अनोख्या पद्धतीने थोडी साजरी करण्यात आली.
श्री गुलाब चीडे, वसंत मत्ते, घुगुल सर, द.वा. हटवार यांच्या नेतृत्वात इथे परिसरातील काळीकचरा, काळ्या जमा करून सोसायटी च्या खुल्या मैदानात जमा करण्यात आला . होळी निमित्ताने तो जाळून होळी साजरी करण्यात आली.होळीच्या पर्वावर संपुर्ण सोसायटीत स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आले.
सर्वांनी कॉलनीतील कचरा एकत्र करून ओपन स्पेस मध्ये दरवर्षी ज्या ठिकाणी होळी जाळली जाते तिथे जमा केला. लाकडं , काळीकचरा, पालापाचोळा एकत्र करून सायंकाळी साडेसात वाजता विधिवत पूजा करून होळीचे दहन करण्यात आले. यावेळी सोसायटीतील वरिष्ठ नागरिक श्री गुलाबराव चिळे, वसंता मत्ते, दयारामजी हटवार, गुगल सर, कवडू मत्ते व सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियान राबवून , अनोखी होळी पेटवून , सर्व सोसायटी वासीयांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.