अभिनव रंगपंचमी उत्सव साजरा .!

स्नेहाचा, भक्तीचा रंग उधळीत स्वच्छता करून श्रीगुरुदेव सेवा मंडळ भद्रावती चे वतीने अभिनव रंगपंचमी उत्सव साजरा .!
भद्रावती (ता. प्र.) - श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नगर स्वच्छता अभियान १९ वा वर्धापन दिन तसेच रंगपंचमी उत्सव निमित्य स्नेहाचा, भक्तीचा, एकतेचा रंग उधळीत परिसर स्वच्छ करून अनेक भजनी दिंडी सह शेकडो गुरुदेव कार्यकर्त्यांचे उपस्थितीमध्ये मिरवणूक काढून अभिनव पद्धतीने रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.
होळी धुलीवंदन सणाला सगळीकडे धामधूम, युवकांचा जल्लोष व समाज मादक द्रव्यांच्या आहारी जात असताना होळी आणि धुलीवंदन वसंत ऋतुच्या आगमनाचा आणि कृषी, पर्यावरण, संस्कृतीचे जतन करणारा निसर्ग आनंदाचा हा सण आहे. या उत्सवालाच वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धी दिन असे म्हटले आहे. याच विचारातून श्रीगुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे वतीने सुरक्षा नगर परिसरामध्ये नगर स्वच्छता करून वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबा यांचे वेशभूषेसह,श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते, शेकडो नागरिक तसेच १६ भजन मंडळ दिंडी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग स्वच्छ करून घरापुढे सुंदर रांगोळ्या ठिकठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमा ठेवन्यात आला होत्या. मिरवणूक सुरक्षा नगर ,गजानन नगर येथून नागमंदिर येथे पोहोचली व त्या ठिकाणी भद्रनाग समितीचे वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले तसेच अल्पोपहाराची व्यवस्था सुध्दा करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक प्रमुख मार्गाने विठ्ठल मंदिर येथे आली. तिथे संपूर्ण भजनी दिंडीसह सर्व भक्तीच्या रंगात न्हाऊन गेले होते.
विठ्ठल मंदिर येथे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. त्यामधे मान्यवरांनी धुलीवंदन उत्सवाचे महत्व सांगितले व त्यानंतर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. वं. राष्ट्रसंत व गाडगे महाराजांची वेशभूषा खुशाल कंचर्लावार व भैय्याजी मिरगे यांनी सादर केली होती. अशा या अभिनव पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाने त्याचप्रमाणे मिरवणुकीने भद्रावतीकरांचे लक्ष वेधले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".