भद्रावती (ता.प्र.) - आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी बहुजन रिपब्लिकण सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती च्या वतीने मा. मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले. नुकतेच 8 महिण्यापूर्वी भद्रावती परिसरात जे डांबर रोड बनवण्यात आले ते रोडं काही दिवसात खराब झाले . भद्रावती शहरात अनेक कामे अशाच पध्दतीने होतात. अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाहि करण्यात यावी आणि रोड ची डागडुजी करण्यात यावी.
तसेच डोलारा प्रभागातील अशोक जवादे सर ते राजु बगडे यांच्या घरा पर्यंत रोड ची डागडुजी करण्यात यावी या करिता निवेदन देण्यात आले. त्या वेळी BRSP शहर अध्यक्ष विकास दुर्योधन तालूका अध्यक्ष डॉ प्रकाश रामटेके व शहर साचिव स्वप्नील कोल्हटकर, दीपक वानखेडे , आणंद भगत, प्रवीन बावणे, सुमेध गुटके, सुधिर इंगोले, आकाश दुर्योधन , विशाल कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्तित होते.