कोची येथे ग्रामगीता प्रणित रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक सार्वजनिक होळी उत्साहात साजरी .!
कोची - भद्रावती (ता.प्र.) - मानवी जीवनाची नाळ ही पर्यावरणाशी जुळलेली असल्यामुळे पर्यावरण रक्षणातच मानवी जीवनाचे रक्षण आहे व पर्यावरणातील ज्या संसाधनांची कमतरता आहे त्याचा नाश न करता ज्या समाजविघातक कुप्रवृती वाढलेल्या आहेत त्याचे प्रतिकात्मक दहन करून होळी साजरी करण्यात आली. गेल्या ११ वर्षा पासून पर्यावरणपूरक होळीची परंपरा कायम ठेवत यावर्षीही विश्वव्यापी श्री गुरुदेव सेवा मंडळ कोची च्या वतीने ग्रामगीता प्रणित रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक सार्वजनिक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मधुकर पुरडकर सर तर प्रमुख अतिथी मा. श्री. किशोर भाऊ तुरंकर, मा.श्री. श्रावण जी. बोढे, मा. पुंडलिक पा. राजुरकर, मा. नामदेव पा. थेरे, मा. शरद पा. राजुरकर (शिक्षक), गावातील प्रथम नागरिक मा. महेंद्र भोयर ( सरपंच कोच्ची ), सौ. लताताई मारेकर , सौ. कुंदाताई तुरंकर यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होते.या सोबतच प्रमुख अतिथीच्या हस्ते समाजातील हिंसाचार,अंधश्रद्धा,भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संध्या राजुरकर हिने केले, तसेच आभार प्रदर्शन कु.अभिषेक भोयर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरीता दत्तू मत्ते,दीपक मारेकर,प्रमोद मारेकर, हनुमान भोयर यांचे उत्तम सहकार्य लाभले आणि समस्त कोची गावं वासीयांचा उत्तम प्रतिसाद लाभला.