काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग, ओबीसी विभाग, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभागचे धरणे आंदोलन.!
चंद्रपूर (वि. प्र.) - काँग्रेस चे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांची वाढती प्रसिद्धी मोदी सरकारला खोचणारी ठरली. त्यासोबतच लोकसभेत मोदी व अदानी यांच्या मैत्रीचे पुरावे देत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळेच आकसापोटी मोदी सरकारने राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करून त्यांना बेघर केले.परंतु भारतीयांच्या मनातून राहुल गांधींचे स्थान मोदी सरकार कदापी काढू शकत नाही असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळील परिसरात धरणा आंदोलन कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्माला अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग, ओबीसी विभाग, अनुसूचित जातीविभाग, अनुसूचित जमाती विभाग तर्फे धरणे आंदोलन घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार अविनाश वारजूरकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय, महाराष्ट्र प्रदेश सचिव विजय नळे, ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली,काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा,मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत,संदीप गड्डमवार महिला ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, महिला शहर काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, विनोद अहिरकर,शहर अध्यक्ष ताजुद्दिन शेख,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष शामकांत थेरे, राजू रेड्डी,सय्यद अनवर, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, अनुसूचित जाती महिला विभाग प्रदेश अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, गोविंद भेंडारकर, संदीप गड्डमवर, प्रफुल खापर्डे, प्रकाश पाटील मारकवार, दिवाकर निकुरे,प्रशांत दानव,प्रवीण पडवेकर,जगदीश सेमले, ताहेर शेख,सय्यद मुकद्दर, प्रशांत भारती, सुलतानअली,आमिर शेख, कृणाल रामटेके, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, शफाक शेख, मतीन शेख, सुबस्टियन, जॉन,नसीम भाई, रिजवान शेख, शालिनी भगत, वंदना भागवत, नाहेदा ,बापू अन्सारी, विशाल नोमुलवार, सय्यद मॅडम, विनय बोधि, जाकिर भाई, ॲड. मेघा भाले,अजगर अलीशेख,शकील सुफी,महेश तावडे,मनीष रामटेके,नेहा मेश्राम,संगीता मित्तल,राजू खोब्रागडे, नितीन रायपुरे,गौतम चिकाटे,राजू गज्जलवर, रवींद्र बाबोळे, तीलक मेश्राम, यांची उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी सांगितले कि, २०१४ पासून भारताची परिस्थिती हि बदलली आहे. भारताचे सामाजिक, राजकीय स्वास्थ बिघडलेलं आहे. लोकशाही हि धोक्यात आली आहे. हुकूमशाही राजवट निर्माण करण्याकडे मोदी सरकारच्या कौल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हि परिस्थिती बदलण्याकरिता सर्वानी एकत्र येऊन मोदी सरकारला मतातून सत्तापरिवर्तन करून धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली यांनी व आभार प्रदर्शन ताहेर शेख यांनी केले.