भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या मेरीट लिस्ट मध्ये स्थान प्राप्त केले आहे. गोंडवाना विद्यापीठाचा २०२१-२२ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. गुणवत्ता यादीत स्थान पटकावत येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. अर्थशास्त्र विषयांतील गुणवत्ता यादीत अविनाश प्रभाकर श्रीरामे (प्रथम), वैभव अरूण कुत्तरमारे (द्वितीय), जयश्री अनिल मोहितकर (पांचव्या) स्थानावर आले आहे. विवेकानंद महाविद्यालयात अर्थशास्त्र संशोधन केंद्र असून त्याचाही लाभ संबंधित विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती डाॅ. प्रकाश तितरे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश तितरे प्रामुख्याने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.