कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न.!

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित मातोश्री नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय भद्रावती येथे विद्यार्थिनीसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींना आपले हक्क व न्याय तसेच कायदेविषयक ज्ञान मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालयात करण्यात आले. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सौ. उज्वला वानखेडे तर प्रमुख वक्ते म्हणून एडवोकेट मनीषा पथाडे उपस्थित होते. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना एडवोकेट पथाडे यांनी स्त्रियांचे हक्क, कायदेविषयक ज्ञान, समाज जनजागृती, महिलांचे अधिकार व सक्षमीकरण यावर बहुमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्रा. सौ. वानखेडे यांनी शिक्षणाचे महत्त्व, सतर्कता व संस्काराचे ज्ञान आवश्यक असल्याचे पटवून दिले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य रेणुका गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुषमा रामटेके यांनी मानले. या प्रसंगी समस्त प्राध्यापक वृंद, महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संखेत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.