भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारे नवनियुक्त शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांच्या सत्काराचे आयोजन नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात दि.7/4/2023 ला आयोजित करण्यात आलेले आहे.
अनेक वर्षानंतर नागपूर शिक्षक मतदार संघाला चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व प्राप्त झालेले आहे.
नवनियुक्त शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांचा सत्कार, तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सिनेट पदावर तसेच विविध प्राधिकरणावर नियुक्त मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात भद्रावती येथे दि.7/4/23 ला आयोजित करण्यात आलेले आहे.
या समारंभाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था् भद्रावती हे आहेत. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून रवींद्र शिंदे, संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, सचिव, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर. डॉ. अनिल शिंदे, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ चंद्रपूर, तसेच सूर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादल चंद्रपूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
नवनियुक्त शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार , तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सिनेट पदावर त्याच प्रमाणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर नियुक्त असलेल्या कर्तुत्ववान मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
या सत्कार सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. कार्तिक शिंदे सचिव, डॉ. विशाल शिंदे सहसचिव, प्राचार्य डॉ. लेमराज लडके, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी केले आहे.