इफ्तार पार्टी कार्यक्रम संपन्न .!

चंद्रपूर जिल्हा पोलिस दल तर्फे ड्रिल शेड येथे इफ्तार पार्टी संपन्न .!

बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जातीय सलोखा अंतर्गत इफ्तार पार्टी चे आयोजन ड्रिल शेड चंद्रपूर येथे करण्यात आले.
चंद्रपूर पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली  २०/४/२०२३ रोजी इफ्तार पार्टी संपन्न झाली .सदर कार्यक्रमात चंद्रपूर उप विभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार राजुरा उप विभागीय पोलिस अधिकारी  पवार साहेब  सह  जामा मस्जिद चे मौलाना दिलशाद रजा,मौलाना कदिर जी,अनवर जी, शरिफुल इस्लाम जी,सह अन्य मौलाना मंचावर विराजमान होते.
मौलाना,मस्जिद पदाधिकारी, शांतता समिती सदस्य सह अनेक गणमान्य या इफ्तार पार्टी ला  हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर उप विभागीय पोलिस अधिकारी  सुधीर नंदनवार यांनी केले व ईद च्या सर्व बांधवाना शुभेच्छा दिल्या. जामा मस्जिद चे मौलाना  यानी रमजान महिना विषयाची माहिती दिली तदनंतर चंद्रपूर पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सखोल मार्गदर्शन करीत "आओ हम सब मिलजुलकर यह त्योहार मनाए,अशी विनंती करित सर्वांना प्रत्यक्ष भेटुन  ईद च्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे संचालन संयुक्त रित्या मंगला आसुटकर व सय्यद रमज़ान अली यानी केले व आभार प्रदर्शन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  रोशन यादव  यानी केले.
या कार्यक्रमाला मुश्ताक रिज्वी,बाबू खान,युनूस भाई,उस्मान भाई,रज्जाक कुरेशी,साबिर सर,सैजुद्दिन भाई,शांतता समिति सदस्य सय्यद रमज़ान अली,सदानंद खत्री,राजेंद्रसिंग गौतम,अशोक हासानी, ताजुद्दीन शेख, गुलाब पाटिल,शालिनी भगत,दर्शन बुरडकर,चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सतिषसिंह राजपूत,रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजेश मुळे,बल्लारपूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक उमेश पाटील,घुग्गुस पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक  आसिफ राजा,जिल्हा विशेष शाखा चे अधिकारी,सायबर क्राईम विभाग चे मुजावर अली,दिलीप कुर्झेकर, सुजित बंडीवार,राजू अर्वेलिवार, शिडाम, अर्जुन मडावी,शकील भाई सह अनेक अधिकारी व पोलिस बांधव यांची उपस्थिति होती. मुस्लिम  बांधव सह विविध जाती धर्माचे मान्यवर या कार्यक्रमात हजर  झाल्याने कार्यक्रम अति उत्साहने संपन्न झाले हे मात्र विशेष.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.