बल्लारपुर (का.प्र.) - राजकारणासह समाजकारणात आपला वेगळा ठसा उमटविनारे चंद्रपूर येथिल सक्रिय कांग्रेस सेवक सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग च्या प्रदेश उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने चंद्रपूर जिल्हासह संपूर्ण राज्यभरात त्यांच्या निवडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.मागील अनेक वर्षापासून कांग्रेस पक्षात ते सक्रिय रित्या कार्य करीत आहे.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे महासचिव,काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे विदर्भ सरचिटणीस,काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सचिव, तेलंगाना विधान सभा निवडणुकीत आदिलाबाद विधानसभा निरीक्षक, अल्पसंख्यांक विभाग गड़चिरोली जिल्हा प्रभारी म्हणून त्यांनी जवाबदारी हाताळली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष पदावर सक्रिय कार्य केल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष या पदावर सय्यद रमजान अली यांची पूनर्नियुक्ती करण्यात आली आहे हे विशेष.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी सय्यद रमजान अली यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी पूनर्नियुक्ती करुन त्यांना पक्ष बळकट करण्याची मोठी जवाबदारी दिली आहे.
त्याच्या या निवडीचे स्वागत काँग्रेस पक्षातील सर्व स्तरावरून केले जात आहे.अली यांनी आपल्या नियुक्ती चे श्रेय काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांना दिले आहे.