बल्लारपुर (का.प्र.) - धाराशिव (उस्मानाबाद) येथे दि. २६ जानेवारी २०२३ रोजी पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती याच दिवशी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संदीपजी काळे सर यांनी महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधवांच्या पाल्यांची शैक्षणिक जबाबदारी घेतली आणि याच दिवशी शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. या समितीच्या राज्य अध्यक्ष पदी श्री चेतन कात्रे यांची निवड करून या योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच या योजनेसाठी समितीच्या अध्यक्षांनी 11 जणांची समितीचे सदस्य म्हणून निवड करत प्रत्येक सदस्यांकडे ३ जिल्ह्याची जबाबदारी देत सबंध महाराष्ट्रातील शेकडो पत्रकार बांधवांच्या पल्यासंदर्भातील शैक्षिक अडचणी ह्या काही ठराविक नियमावलीत (अटी मध्ये ) फॉर्म भरून घेण्यास सुरवात केली. या योजनेच्या पात्रतेसाठी पुढील प्रमाणे नियम होते..
- नियम -
१) किमान मासिक उत्पन्न हे २५ हजारापेक्षा कमी असेल पाहिजे.
२) दैनिक, साप्ताहिक, टीव्ही चाईनेल फक्त या पत्रकारानाच मदत होईल.
३) पत्रकारितेत किमान १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
४) जिल्हाध्यक्ष यांनी सोबतचा फाॅर्म व्हॉट्स ॲप एसएमएस आपण नियुक्त असलेल्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांच्याकडून फॉर्म प्रिंट काढून जास्तीत जास्त पत्रकारांकडून भरून घेऊन आपल्या जिल्ह्यासाठी जे शैक्षणिक मदत कक्ष सदस्य नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे जमा करायचे आहेत. यांच्या मदतीने किंवा आपल्याला ज्या पद्धतीने करता येईल असे जास्तीत जास्त पत्रकारांचे फॉर्म भरून जमा करावे.
या नियमा प्रमाणे दिनांक २४ एप्रिल २०२३ पर्यंत समजून घेऊन फॉर्म भरून घेण्यात आले व दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला. परंतु या योजनेचा लाभ जास्तीत जास्त बांधवांना घेता यावा व कसा घेता येईल याकडे संस्थाप अध्यक्ष, राज्यअध्यक्ष व संपूर्ण समितीचे सदस्य यांचा होता आणि यांनी त्याकडे बारकाईने लक्ष देत नियमातील महत्वाची अट क्रमांक 3 ची जी *"पत्रकारितेत किमान १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक"* कमी करून *"पत्रकारितेत किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक"* निर्णय घेण्यात आला. यामुळे जास्तीत जास्त बांधवांना फॉर्म भरून लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये पुढील प्रमाणे शैक्षणिक मदत केली जाणार आहे.
१. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वप्रथम शासन निर्णय आमलात आणला जाणार आहे.
२. प्रवेशासाठी जागा आरक्षित करणे.
३. नामवंत क्लासेस मध्ये फीस मध्ये सवलत.
४. कमित कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळवून देणे.
अश्या अनेक माध्यमातून मदत केली जाईल.
तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम आहे दिनांक २० मे २०२३ या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज करून कुटुंबासाठी मदत घ्यावी असे आव्हान संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. संदीपजी काळे सर आणि या योजनेचे राज्य अध्यक्ष श्री. चेतन कात्रे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज खालील लिंक वर उपलब्ध आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpbNBSeqtJhJRrc-tZuqJHwwSEwZVEpXVZPBUMQl7hagAtBw/viewform