क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयात तुकडोजी महाराज जयंती साजरी!
वणी (वि.प्र.) - वणीतील नामांकित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, येथे संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मा.श्री. मोहन मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थांनी भाषणे दिली. यावेळी सहा. ग्रंथपाल शुभम कडू आणि वाचनालयातील वाचक मोठया संख्यने उपस्थित होते.