उन्हाळी शिबिराचे आयोजन व महाराष्ट्र दिवस तथा कामगार दिवस साजरा .!

क्रेसेंट पब्लिक स्कूल तथा क्रिएटिव्ह माइंड प्री स्कूल द्वारा उन्हाळी शिबिराचे आयोजन व महाराष्ट्र दिवस तथा कामगार दिवस साजरा करण्ययात आला .!

बल्लारपुर (का.प्र.) - क्रेसेंट पब्लिक स्कूल तथा क्रिएटिव्ह माइंड प्री स्कूल द्वारा उन्हाळी शिबिराचे उद्घाटन व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. क्रेसेंट शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित क्रेसेंट पब्लिक स्कूल तथा क्रिएटिव्ह माईंड प्री स्कूल द्वारा १ मे च्या निमित्ताने महाराष्ट्र दिवस तथा कामगार दिवससाचे आयोजन करण्यात आले. सदर समारंभाला श्री.चंदनसिंग चंदेल माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, मोहम्मद शरीफ सर, माजी प्राचार्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, इस्माईल ढाक वाला, तेजेन्दरसिंग दारी, लकी कलसी, मुन्ना ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हुमेरा खान मॅडमच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्य गीत “जय जय महाराष्ट्र गाझा” श्री विजय पारखी व श्रीमती मनीषा गप्पालवार यांच्या द्वारा प्रस्तुत करण्यात आले.
तत्पश्चात, श्री चंदनसिंगजी चंदेल यांच्या हस्ते ध्वजारोहुण करून राष्ट्रगीत शाळेचे मुलं व अतिथी तसेच शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत गायन करण्यात आले.
या कार्यक्रमात सुवर्ण रामटेके व सुवर्णा जगझाप द्वारा स्वागत तथा महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी क्रेसेंट पब्लिक स्कूल तथा क्रिएटिव्ह माईंड प्री स्कूल द्वारा आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबिर २०२३ बद्दलची माहिती तसनीम मॅडम द्वारा सांगण्यात आले.
तत्पश्चात श्री. चंदन सिंग चंदेल द्वारा रिबीन कापून समर कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. श्री.संजय श्रीवास्तव द्वारा कामगार दिवसाच्या निमित्ताने सौ. सुनीता पाटील व विनाताई मेश्राम यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सौ सपना पाटील बल्लारपूरची प्रथम ऑटोचालीका आहे घरची विपरीत परिस्थिती असून तिला ऑटो चालवावा लागला. तसेच विनाताई मेश्राम त्यांना त्यांच्या पतीला पॅलेसिस दुखापत झाल्यामुळे पेपर वाटप करावे लागले.
सदर महिलांची आत्मविश्वास व सामाजिक विषमतेला बळी न पडता त्यांनी आपल्या परिवाराला सांभाळण्याचे केलेले कार्य समाजासाठी मोठे उदाहरण आहे व समाजाकडून त्यांचे प्रोत्साहन होणे गरजेचे आहे व कामगार दिवसाच्या निमित्ताने शाळेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री.चंदनसिंग चंदेल जी द्वारा त्यांचे प्रतिपादन शाळेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले व पालकांना शाळेसोबत मिळून मुलांच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी द्वारा शैक्षणिक क्षेत्रात घडून आणलेले बदल या बाबत माहिती दिली. सौ. हुमेरा खान प्रधानाचार्य क्रेसेंट पब्लिक स्कूल द्वारा शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली व उन्हाळी शिबिरांबद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती. सोनल ठाकूर द्वारा आभार प्रदर्शन करण्यात आले. सौ. विश्वभारती भगत द्वारा कार्यक्रमाचे संचालन करण्यात आले. कार्यक्रमाची सफलतार्थ श्री. रियाज खान, विनय वासनिक, धिरज राहूड, जॉर्डन अझिम, परवेज व राजू मजगवळी तथा सर्व शिक्षक-शिक्षिका तथा शाळेची इतर कर्मचारी वर्ग द्वारा अथक प्रयत्न करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.