बल्लारपुर (का.प्र.) - नुकतेच समाजीक पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य, व महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चंद्रपूर युवक जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी यांच्या पुढाकाराने व शहर अध्यक्ष अमर धोंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात.हेच काम बघता शहर अध्यक्ष अमर धोंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला, व विक्की माझी शहर उपाध्यक्ष,हिमरोज अली शहर महासचिव,इरफान शेख शहर महासचिव, नितेश गायकवाड शहर सचिव,अझर शेख अल्पसंख्याक अध्यक्ष,अशी नियुक्ती करण्यात आली तर, सुरज चिवांडे, संकेत वनकर,मोहीत विश्वकर्मा, पियुष देशकर, पियुष वानखेडे, पियुष दुपारे, प्रणय नर्मलवार, अरिहांत वोनकर, सुमित बंडीवार,अनिकेत बहुरीया, सुडत मालखेडे, स्वप्नील चिवांडे, राहुल टेंभारे,गणेश महतो,मनीष खानके, संतोष रॉय, अक्षय भोजेकर, प्रेम मद्देला, मनीष घुगरे, जगवीर सिंग संधू, बादल ताकसांडे, वैभव ताकसांडे, अनिकेत ताकसांडे, प्रवीण रामटेके, अमित निखाडे, साहिल गणवीर, मोहित खापर्डे, रोहित निखाडे, तन्मय ताकसांडे, आर्यन पेरके अशे शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षा मध्ये प्रवेश करण्यात आला.तसेच या पक्ष प्रवेश सोहळ्या मध्ये बल्लारपूर शहरातील सामजिक करकर्ते व व्यापारी गोपाल कडेल यांची कामगिरी बघता त्यांना चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदी नियुक्त करण्यात आले.
पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमात बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल उराडे, महिला शहर अध्यक्ष मलेश्वरी महेशकर,बल्लारपूर विधानसभा महिला अध्यक्ष शुभांगी साठे,अर्चना बुटले, कविता बुरचुंडे,शाबीर भाई कुरेशी, राजू जी काब्रा, इब्राहिम खान, आरिफ खान,सुमित (गोलू डोहणे),अजित पडवेकर, रोहन जामगडे,रवी बेज्जला,नितीन सोयाम,अंकीत निवलकर,अमर रहीकवार,इम्रान खान,रोशन चौधरी, राहुल रामटेके, निलेश आत्राम प्रथम अंडस्कर,व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.