बल्लारपुर (का.प्र.) - दि.15-5-23 ला रोज सोमवार ला दर वर्षी प्रमाणे यंदाही साईबाबा चा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 6.वा.साईबाबा चे व शिव पिंडी चे मंगल स्नान करून अभिषेक करण्यात. दिवसभर भजन मंडळ कार्यक्रम करण्यात आला. सकाळी 10 वा बल्लारपुर येथील दिनदयाल वॉर्ड येथील झोपडपट्टी वस्तीत गरीब लोकांना नवीन, जुने सर्व प्रकारचे कपडे वितरित करण्यात आले. त्यानंतर त्यांना अल्पोपाहार, चॉकलेट, बिस्किटे देण्यात आले. पुरुष, महिला व लहान मुलांना, चेहर्यावर हास्य दिसत होते. संध्याकाळी 7 वा महाआरती करण्यात आली.
त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यशस्वी ते साठी पांडुरंग जरीले, साई पिल्ले, राहुल पिल्ले, विजय वर्मा, मनोज बेले, ललित पिल्ले, हरीष खरेबिन, आदित्य वैद्य, जय कुमार शिवानी, रमेश लोणकर, रजत शेरगिरी, नयन मुळकरवार लड्डू शनिग्राम, प्रमोद बोरीकर, अरुण शिवानी, रोहित खोब्रागडे, कार्तिक सातारकर, जितू पिल्ले, महेश मामुळवार, भरत शिवानी, निर्मल सिंग, पिंटू, हेमराज हांडे, प्रशांत मेश्राम, सचिन पाटील, तसेच साईबाबा महिला भजन मंडळ शंकर पुलगमवार, भास्कर शेळके, मेघा कोंडेकर, प्रकाश झाडे, गणपत राखुंडे, रेखा गिरडकर, कुंदा राखुंडे, विमल अंड्रस्कर, माला बेले, सुमन ठाकरे, सुवर्णा कस्ती, शिला, आसुटकर, इंदिरा खानोरकर, विमल मानुसमारे, शांता जरीले, कमलताई येलावार, सचिन ढोके, के.बी.बघेल, अस्मिता भोयर, मंगेश वडस्कर, महेश खोके, यांनी अथक परिश्रम घेतले.