बल्लारपुर (का.प्र.) - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. बल्लारपूर शहरातील नगर पालिका चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. '50 खोके एकदम ओके',महाराष्ट्र त्रस्त खोके घेऊन गद्दार मस्त,पन्नास खोके माजलेत बोके अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक खोके,व फलक देखील आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.
या आंदोलनात प्रमुख उपस्थिती चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी यांची होती तर आंदोलनात बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल भाऊ उराडे, युवक अध्यक्ष अमर धोंगडे, उपाध्यक्ष अजित पडवेकर, सुमित (गोलू) डोहणे, शुभम रहिकवार, हर्ष बरमैय्या, महिला उपाध्यक्ष माया सातपुते,शंकर साळवे,अमर रहिकवार, इम्रान खान,संस्कार सुखदेवे, राहुल रामटेके, नीरज तिवारी,यश देवगडे, बादल ताकसंडे,नितीन घाबर्डे, अमोल वासेकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संकेत उपस्थित होते.