बल्लारपुर (का.प्र.) - श्री दामोदर उरकुडे यांच्या 75 व्या वाढदिवस च्या निमित्ताने मंगी (खुर्द) माध्यमिक जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळा येथे मुलांना नोट बूक, पेन, पेन्सिल, चॉकलेट, देण्यात आले. तसेच बल्लारपुर येथील दिव्यांग, विकलांग, अपंग यांना घरोघरी जाऊन धान्य किट, फळ वाटप करण्यात आले. त्यांचे जीवनात सगळ्या दानात विद्येला खुप महत्व आहे. शिक्षण हेच देशाची प्रगती करू शकतो. प्रोत्साहित करणे हा संदेश पोहचणार आहे. गरिब विकलांग, अपंग यांना अन्न धान्य दान सर्व श्रेष्ठ आहे. दामोदर उरकुडे यांच्या पत्नी सौ विमल, दोन्ही मुले श्री गणेश व सुनील, दोन्ही सुना सौ. सरिता व सौ. माधुरी त्यांचे नातू कु. पूर्वा व सोहम उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक श्री तोडसम,जिल्हा परिषद ,मुख्याध्यापक घडले आश्रम शाळा मंगि,शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, पांडुरंग जरीले, कल्पना कोकस, रेखा चंदाली उपस्थित होते.