बल्लारपूर (का.प्र.) - श्री गुरूदेव साई महिला भजन मंडळ बल्लारपूर यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा स्तरावर कामगार कल्याण मंडळ बंगाली कॅम्प चंद्रपूर द्वारा आयोजित दि. 27 जुलैला स्वयं गीत-स्फूर्ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यात जिल्हातून 11 संघांनी भाग घेतला होता. त्यात श्री गुरूदेव साई महिला भजन मंडळ बालाजी वॉर्ड बल्लारपूर यांना दुसरा विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आला. स्पर्धेत श्री शंकर पुलगमवार, प्रकाश झाडे, शरद उईके, गणपत राखुंडे, मेघा कोंडेकर, सविता पाटील, सुवर्णा कष्टी, सुवर्णा झाडे, स्मिता पिंपळकर, आरती राखुंडे, शीला आसुटकर, संध्या मिश्रा, भास्कर शेळके, तुळशीराम उईके यांनी भाग घेतला. यांनी 1 महिना आधी पासून श्री साईबाबा मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूर येथे तालीम केली होती.