बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथिल हजरत मखदूम शहाबुद्दीन शाह ऊर्फ गैबिशाह वली रह अलैह च्या दरगाह येथे चंद्रपुर चे जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी सी व चंद्रपुर पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली.मोहरम 9,10 अर्थात 28 व 29 जुलै रोजी कारागृह मधील दर्गा चे दर्शन करिता प्रवेश द्वार उघडला जातो हे मात्र विशेष.
सर्वप्रथम जिलाधिकारी विनय गौड़ा व पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे स्वागत सत्कार कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमार कुमरे यानी केले. तद्नंतर जेल प्रवेश द्वार चे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.दर्गाशरीफ येथे चादर अर्पण करण्यात आली फातेहाखानी विधी दरगाह सेवक सय्यद रमजान अली,मौलाना तुफैल,मोहम्मद आमिल यांनी पूर्ण केली.
या प्रसंगी SDPO सुधीर नदनवार,चंद्रपूर शहर पोलिस निरीक्षक सतिषसिन्ह राजपूत, जेल अधिकारी सोनीने, तुरुंग अधिकारी कांबळे, लोमटे,महेंद्र हिरोळे, मुंगळे,दशमवार, वसीम, हटवादे दर्गाह.सेवक, नूर अली, नजीर शेख, शंकर धूमने, दिलीप कुर्झेकर, बंडीवार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.