ग्रामीण भागातील मुलभुत सुविधांसाठी 5 कोटी मंजूर .!

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील मुलभुत सुविधांसाठी 5 कोटी मंजूर .!

बल्लारपुर (का. प्र.) - गावांचा विकास झाला तरच जिल्ह्याचा सर्वंकष विकास होऊ शकतो, जिल्ह्याच्या विकासासाठी कायम आग्रही असणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. 
गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधीकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतात. यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागात मुलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून,मूल तालुक्यातील विविध गावांसाठी 3 कोटी 29 लक्ष रुपये, चंद्रपूर तालुक्यातील गावांसाठी 44 लक्ष, सावली तालुक्यासाठी 15 लक्ष, पोंभुर्णा तालुक्यासाठी 82 लक्ष तर बल्लारपूर तालुक्यातील गावांसाठी मुलभुत सुविधा पुरविण्याकरीता 30 लक्ष रुपयांचा समावेश आहे. 
सदर निधीमधून विविध गावांत सिमेंट रस्त्याचे बांधकाम, रस्त्याचे खडीकरण, सभागृह बांधकाम, समाजभवन बांधकाम, संरक्षण भिंत व शौच्छालय बांधकाम, चौकाचे सौंदर्यीकरण, पाणंद रस्त्याचे बांधकाम, स्मशान भुमीकरीता रस्ता तयार करणे, नालीचे बांधकाम, टाकीसह ट्युबवेल बसविणे, शाळा आणि ग्रामपंचायतीच्या भिंती बोलक्या करण्याकरीता रंगरंगोटी करणे, हायमास्ट लाईट बसविणे, बस थांब्याकरीता शेड मंजूर करणे, विद्युतीकरण आदी मुलभूत कामे करण्यात येणार आहे.
गावाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या 5 कोटी रुपये मंजूर निधीसाठी ना.सुधीर मुनगंटीवार यांचे गावकऱ्यांकडून आभार मानले जातं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.