सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारीणी गठीत.!

बल्लारपुर (का.प्र.) - वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांची हक्काची संघटना असावी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी तीनही तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारणी दि. २२ ऑगस्ट २०२३ ला वणी येथे गठित करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र विधाते, उपाध्यक्षपदी देवेंद्र भाजीपाले, सचिवपदी प्रमोद लोणारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्याबरोबरच सहसचिव सुभाष राखुंडे, कोषाध्यक्ष शुभम कडू, कार्यवाह गजानन कोकुडे, सहकार्यवाह दिवाकर कावडे, सदस्य अरविंद दूधुलकर, अमोल पेटकर, उमेश रासेकर, राम मेगावार, ललित पडोळे, प्रज्वल गोहकार यांची निवड झाली. संघटना वाढीस व बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सुरेंद्र विधाते यांनी आपल्या निवडीबद्दल बोलताना सांगितले. या निवडीबद्दल समाजमाध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.