सेफ्टी अधिकारी वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा कामगारांचा आरोप .!
बल्लारपूर - (का.प्र.) - दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळ चा शिफ्ट मध्ये एक वाजता चा दरम्यान काम करीत असताना एक कामगार चार फूट खोल गड्यात गरम केमिकल युक्त पाणी मध्ये पडून अपघात झाला होता, त्याला तात्काळ खाजगी दवाखान्यात चंद्रपूर (पोतदार) दाखल करण्यात आले तेथुन नागपूर ला हलवण्यात आले पण आज दि. 25 रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला, अपघातात तो गड्यात पडल्याने कंबर पर्यंत गरम केमिकल (ऍसिड युक्त) पाण्यात भाजला गेला.
बिल्ट प्रशासन नेहमी कामगारांना मानसिक त्रास देतात कुठलीही सुरक्षा देत नसून कामगारांना धोकादायक ठिकाणी काम करायला मजबूर करतात एखाद्या कामगार काम करण्यास नकार दिला तर कामावरून कमी करण्याची धमकी देतात आताचे ताजे उदाहरण एक कामगार मिल चा व्यवस्थापन मुळे आत्महत्या केली आणि मृत्यू पुर्व (सुसाईड नोट) लिहून गेला होता,दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
येथील कामगारांचा आरोप आहे की मिल मध्ये सिव्हिल काम चालू आहे आणि त्या करीत 3×3 चा 4 फूट खोल गड्डा खोदला गेला पण गड्डा चा भोवताल कोणतेही सुरक्षा कवच लावल्या गेले नाही आणि त्यागड्ड्यात 70°डिग्री केमिकल युक्त गरम पाणी चे साठवण करतातपण 14 रोजी पावसाळ्यात असल्याने पाऊस पडत असल्याने वरचा पाउस चे पाणी गड्ड्यात पडत असल्याने गड्ड्यात ले पाणी चे तापमान कमी झाले नाहीतर तिथेच कामगार दिगंबर महाजन चा जागेवरच मृत्यू झाला असता, हे सर्व सेफ्टी चे अधिकारी याचे मुळे झाल्याचा आरोप करीत आहे.मृतक दिगंबर अजब राव महाजन रा. किल्ला वॉर्ड (46) त्याला दोन लहान मुले आहे पत्नी आणि लहान मुले यांचे भरण पोषण कसे होणार?