"मी आय. ए. एस. होणार" .!

अभ्यासातील सातत्य व जिज्ञासेने अधिकारी होता येते - डॉ.काठोडे
"मी आय ए एस होणार" हा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..!

बल्लारपुर (का.प्र.) - श्री साई आय.टी. आय. भद्रावती व रोटरी क्लब भद्रावती च्या संयुक्त विद्यमाने “ मी आयएएस अधिकारी होणारच “ हा प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम भद्रावती येथे साजरा झाला.
भद्रावती येथे श्री साई आय.टी. आय. जैन मंदिर रोड भद्रावती येथील सेमिनार हॉलमध्ये श्री साई आय टी आय व रोटरी क्लब भद्रावतीच्या संयुक्त विद्यमाने “ मी आयएएस अधिकारी होणारच “ हा प्रशिक्षण मार्गदर्शन व विद्यार्थ्यांशी संवाद साधून सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मार्गदर्शन शिबिराच्या व्यासपीठावर अध्यक्ष, अनिल धानोरकर नगराध्यक्ष तथा अध्यक्ष रोटरी क्लब भद्रावती, मार्गदर्शक डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक आय ए एस अॅक्याडमी अमरावती, श्री मिलिंद हांडे कौशल्य विकास व उद्योजकता संचालक नागपूर , मिलिंद राऊत शास्त्रज्ञ कृषी विभाग, सुनील भिसे तंत्र विभाग निवृत्त निर्देशक, किशोर पत्तीवार प्रोजेक्ट हेड रोटरी क्लब व संचालक साई आयटीआय भद्रावती,सुधीर पारधे सचिव रोटरी क्लब भद्रावती, विक्रांत बीसेन कोषाध्यक्ष रोटरी भद्रावती आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
रवींद्र तीरानिक, जनमंच सदस्य तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साई आय.टी. आय. भद्रावती चे संचालक श्री किशोर पत्तीवार यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल धानोरकर, अध्यक्ष नगरपरिषद भद्रावती तथा अध्यक्ष, रोटरी क्लब भद्रावती त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्याला नगरपरिषदचे अभ्यासिकेत येण्याची आव्हान केले. एक रुपयांमध्ये अभ्यासिकेत प्रवेश मिळू शकतो व ३६५ रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभर पुस्तक वाचायला मिळतात, असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिलिंद राऊत (कीटक शास्त्रज्ञ कृषी तज्ञ सल्लागार आयबीएन लोकमत, साम टीव्ही,झी 24 तास, बीबीसी,) यांनी कृषी क्षेत्रातील माहिती शेतकऱ्यांच्या मुलांना व शेतकऱ्यांना कमीत कमी पैशांमध्ये शेतीचे कसे विसीत करून कमी खर्चामध्ये कसे उत्पादन करावे याबद्दल मुलाना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख सुनील भिसे (शासकीय तंत्र विभागाचे सेवानिवृत्त निर्देशक) यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री मिलिंद हांडे (कौशल्य विकास व उद्योजकता नागपूरचे संचालक) यांनी विद्यार्थ्यांना आय. ए . एस. चा अभ्यास केल्यास व आपण आय. ए . एस. होऊ न शकल्यास आपले शिक्षण वाया न जाता ते शिक्षण भावी जीवनासाठी उपयुक्त ठरेल, असे मोलाचे मार्गदर्शन केले. तंत्रशिक्षणासाठी सुद्धा आपल्याला या शिक्षणाचा पुरेपूर फायदा होईल असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर प्राचार्य नरेशचंद्र काठोळे (पंजाबराव देशमुख आयएएस मिशनचे प्रमुख व अमरावती अकॅडमीचे संचालक) यांनी आय. ए . एस. मिशन बद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आय. ए . एस.चे प्रशिक्षणाबद्दलची माहिती सोपी करून सांगितली. पाचवी ते बारावीपर्यंतचाच अभ्यासक्रम आयएएस च्या प्रथम परीक्षेमध्ये येतो, असे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये फेरीलँड स्कूल भद्रावती येथील ५० आदिवासी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला हे विशेष . या प्रशिक्षक मार्गदर्शन शिबिर मध्ये भद्रावती मधील जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री साई आय.टी. आय. भद्रावती निदेशक ग्रीष्मा नागदेवे व रोशनी रामटेके यांनी केले . आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश हटवार रोटरीयन भद्रावती यांनी केले. 
हा मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री साई आय. टी. आय. प्राचार्य श्री राजेश नगराळेे, प्रोजेक्ट इन्चार्ज कौस्तुभ गाडेकर,निदेशक ताराचंद उंमरे, विशाल जगताप, सुनील शेंडे, प्रमोद साखरकर, सुप्रिया बाला, अश्विनी भसारकर, उषा पेटकर, विकास बदखल, तसेच रोटरी क्लबचे सचिव रोटे. सुधीर पारधी, रोटरी क्लबचे कोषाध्यक्ष रोटे. विक्रांत बेसन भिसेन, रोटरी क्लब चे प्रोजेक्ट इनचार्ज रोटे किशोर पत्तीवार, रोटे. डॉक्टर माला प्रेमचंद्र (माजी अध्यक्ष) रोटे. डॉक्टर अमित प्रेमचंद, रोटे. विनोद कांबळे, रोटे. प्रकाश पिंपळकर, रोटे. आनंद क्षीरसागर, रोटे. युवराज धानोलकर रोटे. कीर्ती गोहने, रोटे. किशोर खंडाळकर, रोटे. सुनील पोटदुखे, रोटे. अविनाश सिदधमशेट्टीवार, रोटे. किशोर भोसकर, रोटे. रुकसना शेख, रोटे संजय बोरकुटे यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.