तोच मी शिक्षक .!

पहिल्यांदा विद्यार्थी जोर जोरानी रडत रडत मला टक टक बगतो नंतर खुप घाबरतो,तोच मी शिक्षक। 
शाळेतिल प्रत्येक विद्यार्थी आपलाच बाळ वाटतो, म्हणुन त्याला बाळा सारखा साभाळतो,तोच मी शिक्षक। 
लहान चिमुकले विद्यार्थी कधी आई,कधी बाबा,कधी आजि,तर कधी आजोबा, बोलुन बोलुन रडतात त्यांना शांत करण्याकरिता,मी सर्व रूप धारण करतो,तोच मी शिक्षक। 
विद्यार्थी थोडा मोठा झाला पाँचवी पर्यंत एक टप्पा ओलांडून दुसऱ्या टप्यात आला तिथे शिस्तीची काडी घेवून मी उभा राहतो,त्याचा राग सतत सहन करतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनाला शिस्तीचा घोळ देतो,तोच मी शिक्षक।
विद्यार्थी सातवी पर्यंत दूसरा टप्पा ओलांडून तिसरया टप्यात आला तिथे मला बघून आनंदी झाला, आता देतील पंख मला गगनात उडण्यासाठी अश्या आशेनि मला स्फुर्ति देवू लागला,तोच मी शिक्षक।
आता दहावी झाली,नव जीवनाची सुरुवात झाली, कोणता विषय घेवु कश्यात भविष्य बनवु विचार आले, धरले हाथ शिक्षकानी तुझ आयुष्य ठिकाणी,तोच मी शिक्षक।
कॉलेजची मज्जा सुरु झाली, या वयात पाय घासरू नये म्हणून त्याला सांभाळणारा , त्याला वारंवार आपल्या आई बाबा चे कष्ट आठवून देणारा, वयाच्या नाजुक काळात सावरणारा,तोच मी शिक्षक।
मी नेता, अभिनेता,सैनिक,डॉक्टर, इंजीनियर, असंख्य असे युवा बनवले,तोच मी शिक्षक।
आणि आज मला शिक्षक बनवुन या मंचावर शिक्षकाचे गुणगान गायला योग्यता देनारा तो ही होता एक शिक्षक आणि मी पण आज,तोच एक शिक्षक।
कवि - राहुल जी. गौर
ज्योतिबा जूनियर कॉलेज नंदनवन, नागपुर

1 Comments

  1. खरं आहे सर , आम्हाला घडवणारे ही तुम्हीच , वयाच्या नाजूक काळात सवरणारे ही सुद्धा तुम्हीच , आई बाबा नंतर सर्वात मोठा गुरू म्हणजेच आपले शिक्षक .....
    माननीय ; राहुल गौर सर.
    तुम्हला शिक्षक दिनानिमित्त
    हार्दिक शुभेच्छा..💐💐

    तुमचा विद्यार्थी ; अनिकेत गो. चांदेकर
    💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
Previous Post Next Post
clipboard.