चंद्रपूर (वि.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले चंद्रपूर शहराचे भूमिपूत्र तसे वेकोली वणी क्षेत्राचे मागील तीन वर्षापासून महाप्रबंधक पदाचा पदभार सुरळीत व यशस्वीपणे सांभाळलेले इंजि.उदय कावळे यांची कोल इंडियाच्या नवरत्ना पैकी एक असलेल्या भारत कोल कुकिंग लिमिटेड मध्ये १२ ऑगस्ट २०२२ रोजी तांत्रिक निर्देशक पदी त्यांची नियुक्ति करण्यात आली होती आता त्यांना महानंद कोल लिमीटेड चे नविन सीएमडी या पदाची जबाबदारी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या व जबाबदार पदावर पदोन्नती मिळणारे ते महाराष्ट्रातील विदर्भाचे एकमेव मराठी व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना देण्यात आलेल्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . मुळचे चंद्रपूर येथील रहिवासी असलेले उदय कावळे यांनी मायनिंग मध्ये इंजिनिअरींग चे शिक्षण घेतले. व आपल्या कार्य-कर्तृत्वाच्या भरवशावर यश संपादन केले. त्यांच्या उत्कृष्ठ कार्यामुळे त्यांना विभागाने वेळोवेळी पदोन्नती दिली. ज्या पदापर्यंत आज ते पोहोचले आहेत, हे त्यांच्या कार्य कर्तृत्वाचे फळ आहे.