चंद्रपुर LCB ची मोठी कारवाई जिल्ह्यात 2 देशी कट्टे जप्त.!

बल्लारपूर (का. प्र.) - मा.पोलीस अधिक्षक सर चंद्रपूर यांनी अवैदधरीत्या शस्त्र व अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारा विरुध्द विशेष मोहीम राबविण्याचे दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे पथक तयार करुन दि. 22/09/2023 रोजी पोस्टे विरुर हद्दित्तील कोहपरा गावातील अमर रमेश आत्राम हा इसम वय अंदाजे 19 - 20 वर्ष हा आपले राहते घरी अवैदधरीत्या अग्नीशस्त्र बाळगुन आहे, अश्या खबरेवरुन कारवाई करत आरोपी नामे अमर रमेश आत्राम वय 19 वर्षे, रा.कोहपरा ता.राजुरा जि.चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र किंमत 10,000/- रू. व एक एन्डरॉईड मोबाईल किंमत 10,000,/- रू. असा असा एकूण 20,000/- रू. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले.
तसेच यापुर्वी दि.18/09/2023 रोजी पो.स्टे. राजुरा येथे आरोपी नामे राजरतन राहुल वनकर वय 18 वर्षे, रा.विहीरगाव ता. राजुरा जि.चंद्रपुर याचे कडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व 1 जिवंत काळतुस व मोबाईल जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टे. राजुरा येथे अप. 509/23 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
यातील आरोपी नामे अमर रमेश आत्राम वय 19 वर्षे रा.कोहपरा ता.राजुरा जि.चंद्रपुर विरुध्द दि. 22 /09/2023 रोजी पो.स्टे. विरुर येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची यशस्वी कामगीरी मा.पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि.महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल विनायक कावळे, पो.ना. अनुप डागे, जमिर पठाण
नितेश महात्मे, मिलींद चव्हान, पो.शि. प्रसाद धुळगंडे, चानापो दिनेश अराडे सर्व स्था.गु.शा.चंद्रपुर यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.