युवक कांग्रेस तर्फे बल्लारपुर शहरात जनसंवाद यात्रा .. जनतेशी साधले संवाद.!

बल्लारपुर (का.प्र.) - कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रेच्या यशाने भारावलेल्या कॉंग्रेस पक्षाने आता जनतेशी संवाद साधण्याच्या कार्यक्रम आखला. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार बल्लारपुर शहरात माजी खा. नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात युवक कांग्रेस पूर्व जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थित व युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात वस्ती विभाग, कॉलरी यूको बैंक पासून सुरुवात होऊन महात्मा गांधी पुतळा गोलपुलिया, रविवार बाजार तसेच मुख्य मार्गाने काटा गेट पर्यंत बल्लारपुर युवक कांग्रेस तर्फे जनसंवाद यात्रा काढण्यात आले. शहरातील अनेक नागरिकांना व रविवार बाजारातील व्यापारी बाजारात आलेल्या लोकाना कांग्रेस पक्षाने विचार व केलेले अनेक कार्याबद्दल माहिती समजावून सांगितले व संवाद साधला. याठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर जनतेशी संवाद साधले. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार,महीलांवरील अत्याचार,शेतक-यां वरील अन्याय यासह स्थानीक मुद्यांवरही जनसंवाद यात्रेतील नेते जनतेशी संवाद साधले. यावेळी दुर्गेश चौबे, शफाक शेख एनएसयुआय जिल्हा अध्यक्ष, देवेंद्र आर्या माजी गट नेता, ॲड. पवन मेश्राम, माजी नगराध्यक्ष छाया मड़ावी, शोभा महतो, विनोद आत्राम, स्वप्निल तिवारी,शफाक शेख, प्रतीक तिवारी,शंकर महाकाली, स्नेहल चालूरकर, जुन्नैद सिद्दीकी,अजय रेड्डी, दानिश शेख,जीशान सिद्दीकी, राजेश केशकर, विवेक कुटेमाटे, रवि गड्डमवार, आकाश दुर्गे, गोपाल कलवला,अकरम शेख, प्रांजल बालपांडे, सुनील मोतीलाल, कैलाश धानोरकर, चंचल मून,संदीप नक्षीने, बशीर सिद्दीकी, श्रीकांत गुजरकर, पितेश बोरकर,संजु सुददला, नितिन मोहरे, मास, मुरली व्यवहारे,रमेश राय, रोशन ढेगळे,रोहित सक्सेना, शाहबाज खान,रोहित पठान, दीपक भास्कर, अक्षय आरेकर,अमोल काकड़े, आफताब पठान, आशिक मुद्देवार, सूरज ठाकुर, वसीम खान, आदिल सिद्दीकी, नेहाल शेख, दानिश पठान, प्रतिनिक रामटेके, मुन्नू भाई, पवन चौहान,रवि वासाडे,तुषार निषाद, युवराज मोहरे आणि कार्यकर्ते मोठया प्रमाणात जन सवांद यात्रेत सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.