नवरात्रीची आस .!!
रोज माळी रोज आरती
जेवायास बाल कुमारी
पक्वानांची नवीन चव
जिभेवरती तरंगळणारी
धुणे काढणे ,रंगरंगोटी करणे
सतत दिवस कामाचा
नवरात्राच्या आगमनाची चाहूल
क्षण न मिळे उसंताचा
धुप-दीप च्या उजेडात
राळ-फुलांच्या सुवासाची किमया
करुनि देवींच्या मूर्तीचे स्वागत
भरून हृदयी वाढवी माया
वाहणं सोडू, उपवास पकडू
सोडू बिछाना झोपाया
देवीच्या स्मरणात राहू
दिवस-रात्र भजन कराया
गोंधळ जोगवांची रंगत
साखळी आरत्या संगे
तालसुरांच्या जोडीने
भक्तीगण मनसोक्त रंगे
नवरंगांनी सजलेली देवी
नऊ दिवसांची रंगत न्यारी
नवरात्रीची रचना करूनि
स्मित शब्द उधळून सारी..
सौ. स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर.
नांदेड-7420918198