विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने ३५० शिव राज्याभिषेक सोहळा व विश्व हिंदू परिषद षष्ठीपुर्ती वर्षा निमित्य भव्य शिव शौर्य यात्रा.!
बल्लारपुर (का.प्र.) - आज दि.११/१०/२०२३ रोज बुधवार ला बल्लारपुर शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने ३५० शिव राज्याभिषेक सोहळा व विश्व हिंदू परिषद षष्ठीपुर्ती वर्षा निमित्य भव्य शिव शौर्य यात्रा दाखल झाली.या यात्रेचे मा.श्री चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य तथा बल्लारपुर विधानसभा - ७२ प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री हरीश शर्मा भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष न.प. बल्लारपुर यांच्या नेतृत्वात भाजपा बल्लारपुर च्या वतीने मोठ्या उत्साहात बल्लारपुर बस स्थानक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भव्य स्वागत करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी भाजपा बल्लारपुर चे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.