निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना तर्फे कर्करोग वर जागरूकतेच्या कार्यक्रमाचे आयोजन.!
भद्रावती (वि.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एक दिवसीय कर्करोग वर जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके, प्रमुख वक्ते डॉक्टर आशिष बारब्दे, डॉक्टर टिंकल डेंगळे, व डॉक्टर अपर्णा चालूरकर टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र हरणे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे संस्थापक सचिव स्वर्गीय नीलकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला मार्ल्यापन व पाहुन्याच्या स्वागताने झाली.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे यांनी कार्यक्रम मागचा हेतू व कर्करोग बद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे असे प्रास्ताविकेतून स्पष्ट केले.
याप्रसंगी चंद्रपूर येथील टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनचे डॉ आशिष बारब्दे यांनी कर्करोगाबद्दल विस्तृत माहिती दिली त्यात कर्करोगाचे कारणे, लक्षणे, उपचार, औषधे व निदान यावर प्रकाश टाकला तसेच याप्रसंगी डॉक्टर टिंकल ढेगळे यांनी ओरल कॅन्सर बद्दल पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तोंडाच्या कॅन्सर ची माहिती दिली त्या तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे व उपाय योजना यावर प्रकाश टाकीत याची जगभराची व देशाची आकडेवारी सांगितली तसेच आजच्या युवा पिढीला कोणत्याही व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
तसेच डॉक्टर अपर्णा चालूरकर यांनी ब्रेस्ट कॅन्सर व सर्वाइकल कॅन्सर विषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे निदान व उपचार तसेच सर्वाइकल कॅन्सर बद्दल लक्षणे निदान व उपचार यावर सविस्तर माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांचे समाधान केले तसेच मुखाचा ड्रेसचा व सर्वाइकल कॅन्सर किंवा कोणत्याही प्रकारच्या कॅन्सर असो प्राथमिक लक्षणे दिसतातच तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ला घेऊन उपचार सुरू करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांनी कर्करोगाबद्दल सर्वांना जागरूक राहण्याचे व त्याचे प्राथमिक अवस्थेतच निदान करण्याचे आवाहन केले व विद्यार्थ्यांना कोणत्याही व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात नागपंचमीनिमित्त नाग मंदिरात स्वयंसेवकाचे कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ गजेंद्र बेंद्रे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक लेफ्टनंट सचिन श्रीरामे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक संदीप प्रधान, प्राध्यापक डॉ एम एन खादरी, प्राध्यापक डॉ नथू वाढवे, प्राध्यापक रोशनी जॉन, प्राध्यापक स्वीटी देरकर, श्री तेलंग, श्री भावरकर, श्री आखतकर, श्री मानकर,व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रांजली मून, मयुरी बालपाने, निकिता कापटे, श्रेयस रोडे या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.