रन, वॉक व स्वच्छता अभियानाचे आयोजन.!

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात फिट इंडिया स्वच्छता फ्रीडम रन 4.0 अंतर्गत रन/वॉक व स्वच्छता अभियानाचे आयोजन.!

भद्रावती (वि.प्र.) - भद्रावती स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या फिट इंडिया स्वच्छता फ्रीडम्र रन 4.0 अंतर्गत रन/वॉक व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल. एस. लडके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत रन/ वाक करण्यात आले त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी उपस्थितांना रन /वॉक व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले अशा प्रकारच्या अभियानामुळे आपल्या परिसरातील स्वच्छता व लोकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ ठेवणे त्यामुळे आपली व देशाची प्रगती होण्यास मदत होते असे मार्गदर्शन केले.
या अभियानाच्या कार्यक्रमाचे संचालन,प्रास्ताविक व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉक्टर गजेंद्र बेदरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा संदीप प्रधान, डॉ खादरी, प्रा कुलदीप भोंगळे, प्रा डॉ शशिकांत शित्रे, प्रा डॉक्टर प्रवीण कुमार नासरे, श्री भावरकर, श्री तेलंग, श्री आखतकर, श्री मानकर व महाविद्यालयातील मयुरी बालपने साक्षी आत्राम, प्रज्वल मते, प्रीतम असमपलिवार, प्रांजली मून, मोनालीसा साने या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.