महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.!

पोदार इंटरनॅशनल स्कूल, बल्लारपूर या शाळेमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.!

बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामधील पोदार इंटरनॅशनल स्कूल, बल्लारपूर या शाळेमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य डॉ. राकेश रंजन सर यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.राकेश रंजन सर यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजीचे आवडते भजन 'रघुपती राघव राजाराम' हे गायले. तसेच काही विद्यार्थिनीनी नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या वेशभूषा केल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. 
'सत्य आणि अहिंसा' या मूल्यांची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती 2 आक्टोबर हा दिवस 'स्वच्छ भारत दिवस' म्हणून साजरा केला जातो.
स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्रसेनानी, देशभक्त लालबहादूर शास्त्रीजी असे पंतप्रधान होते की ज्यानी देशाला 'जय जवान जय किसान' चा नारा दिला. याला राष्ट्रीय नारा असे म्हणतात, जे देशाच्या सैनिक आणि शेतकऱ्याचे श्रम प्रतिबिबित करते.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकत शाळेचे प्राचार्य डॉ.राकेश रंजन सर यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन गौरव भारती तसेच आभार प्रदर्शन अफान अन्सारी या विद्यार्थ्यानी केले.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.