निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती ”उत्कृष्ट महाविद्यालय“ पुरस्काराने सन्मानित.!

भद्रावती (वि.प्र.) - चंद्रपूर येथे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासुन उल्लेखनिय कामगिरी करणा-या निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयास गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने ”उत्कृष्ट महाविद्यालय“ पुरस्कार देउन नुकतेच सन्मानित केले आहे ़ 
अर्धशतकापूर्ती केलेल्या के ़जी ़टू ़पी ़जी ़ अशी व्यवस्था असलेल्या भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित निळकंठराव शिदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती शिक्षण क्षेत्रात नवनवे प्रयोग करण्यात अग्रेसर आहे ़ मागील वर्षी राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद बंगलोरद्वारा CGPA 2.94 व B++ श्रेणीने प्रमाणित झाल्यानंतर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने दिलेल्या महाविद्यालयाला सर्वेच्च सन्मानाबद्दल परिसरात व समस्त विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण पसरलेले आहे ़ या पुरस्काराने महाविद्यालयाच्या गौरवात आणखी एक सन्मानाचा तुरा रोवलेला आहे ़ 
आजवर या महाविद्यालयाचे 12 विद्यार्थ्यानी विद्यापीठाच्या मेरीट यादीत स्थान मिळविलेले आहे ़ 2 विद्यार्थ्यानी सुवर्णपदकावर नांव कोरलेले आहे ़या महाविद्यालयाचे उच्च शिक्षण व संशोधन केंद्रातून तब्बल 32 संशोधकांनी संशोधन कार्य पुर्ण करुन विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे ़ हा गोंडवाना विद्यापीठ क्षेत्रातील संशोधन कार्याचे विक्रमाचा बहुमान महाविद्यालयास अल्पावधीतच मिळालेला आहे ़ राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये महाविद्यालयास मानाचा ”एकक“ पुरस्कार तसेच उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त झालेला आहे ़महाविद्यालयाच्या ”शब्दशिल्प“ या वार्षीकांकास विद्यापीठाने दोनदा पुरस्कार देउन गौरवान्वित केले आहे ़ येथील शिक्षकवृंदाना ”उत्कृष्ट शिक्षक“ पुरस्कार देउन सन्मानित केलेले आहे ़ 
 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या 12 व्या वर्धापन दिन सोहळयाच्या निमित्ताने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 25000/- देउन महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष मा ़ डाॅ ़विवेक शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य, डाॅ ़लेमराज लडके यांनी स्वीकारला ़
या प्रसंगी व्यासपीठावर आमदार डाॅ ़देवराव होळी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी मा ़संजय मिना, कुलगुरु डाॅ ़प्रशांत बोकारे, विद्यापीठाकडून जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित प्रसिध्द समाजसेवी डाॅ ़सतिष गोगुलवार, प्र ़कुलगुरु डाॅ ़श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ ़अनिल हिरेखण, तसेच गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे समस्त मान्यवर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते ़ सदर पुरस्कारामुळे आम्हाला उंच भरारी घेण्याची व विद्यार्थीभिमुख शैक्षणिक प्रयोग करण्याची उर्जा नव्याने मिळाल्याची प्रतिक्रिया मा प्राचार्य, डाॅ लेमराज लडके यांनी नोंदविलेली आहे ़ 
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे मा कुलगुरु डाॅ ़प्रशांत बोकारे, प्र कुलगुरु डाॅ श्रीराम कावळे, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सचिव प्रा ़डाॅ ़कार्तिक शिदे, सहसचिव प्रा ़डाॅ ़विशाल शिदे समस्त पदाधिकारी विश्वस्थांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद व समस्त कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे ़

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.