निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात पदवी प्रधान समारंभ कार्यक्रम संपन्न .!

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात पदवी प्रधान समारंभ, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन.!

बल्लारपुर (का.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व बक्षीस वितरण समितीच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात सत्र 2021-22 मधील विद्यार्थ्यांचे पदवी प्रदान समारंभ तसेच सत्र 2022 -23 मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रिया शिंदे, प्रमुख अतिथी डॉक्टर विशाखा शेळके, मुख्याधिकारी, भद्रावती, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे व कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे व भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सदस्य माजी प्राचार्य श्री मोहन पुसनाके यांच्या उपस्थितीत पार पडला. 
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे संस्थापक सचिव स्वर्गीय निळकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण व राजमाता जिजाऊ व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन व पाहुण्यांच्या स्वागताने झाले. 
सदर कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे यांच्या सन्मान स्त्री शक्तीचा या संकल्पनेवर आधारित घेण्यात आला.
सर्वप्रथम प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी आपल्या प्रास्ताविकेतून कार्यक्रम आयोजनामाचा हेतू स्पष्ट करीत दरवर्षी गोंडवाना विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभ नंतर सलग्नित महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व महाविद्यालयाद्वारे 50 विविध बक्षिसे देण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व इतर विद्यार्थी सुद्धा गुणवत्ता यादीत येण्याकरिता प्रयत्न करतात.
यानंतर पदवी प्रदान समारंभास सत्र 2021-22 मधील बी.एससी, बी.ए., एम. ए., व एम. एससी. एम एस सी मधील नम्रता देसाई, खुशबू लीलारे, कुणाल पतरंगे, मयूर गौरकार, मेहंदी चालखुरे, नूतन कोरडे, नेहा प्रसाद, अमोल गायकवाड, वर्षा कुत्तरमारे, प्रतीक्षा खंगार, दामिनी काकडे, विद्या धोटे, जयताश्री पारखी, प्रयोगा तेलंग, गौरव कुरसंगे, आकांक्षा आवारी, विजय फुलकर, मेघा यडलावार, राकेश सिंग, मोनीश कातवडे, अश्विनी कडूकर व आशिष निखाडे या विद्यार्थ्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली तसेच एन.सी.सी. मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रथम बोरकुटे, रुपेश देशमुख, सिमरन शेख, निखिल भुसेवार, यश कामतकर, प्रणिता वाबेडकर व पंकज सोयाम यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी डॉक्टर विशाखा शेळके, मुख्याधिकारी, भद्रावती यांचा डॉ प्रिया शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ विशाखा शेळके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात विद्यार्थ्यांना शालेय जीवन सोडून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करीत असल्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या त्यामुळे यश गाठणे महत्त्वाचे व आवश्यक आहे तसेच आज मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे मुलींनी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे तसेच आज स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची नितांत गरज आहे ताकरिता जिद्द चिकाटी व मेहनत करण्याची आवश्यकता आहे तसेच जीवनात यशस्वी होण्याकरिता व्यसनापासून दूर राहण्याची व आपले ध्येय गाठण्यासाठी मार्ग निश्चित करण्याची गरज आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या गुणवत्ता यादीत स्थान निश्चित केल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे शिष्यवृत्ती रोख स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यात प्रफुल लोहे, सिद्धांति सोनवणे, अनामिका चौधरी, नम्रता लांजेवार, ऐश्वर्या तिवारी, सृष्टी शर्मा, माधवी कडूकर, शुभम असमपलिवार, आफरीन शेख, कोमल गं जंगापल्ली, यामिनी मारापल्ली, समीक्षा स्वान, गुडिया पठाण, प्राची वाबिटकर, प्रांजली विश्वास, राजश्री दीक्षित, प्रणिता वावीटकर, विधी शर्मा, महेश्वरी काळे, सुप्रिया बालपने, सोनम विधाते, सोनम विधाते, अनुष्का जवडे, इशिका वाकडे, सोनाली बावणे, प्रशांत बडगुळवार, परिक्षिता काकडे, कुणाल पतरंगे व दिव्या पझारे यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर महाविद्यालया तर्फे तर्फे उत्कृष्ट विद्यार्थी कुमारी अनामिका चौधरी हिला स्टुडन्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला.
यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ, भद्रावती डॉक्टर प्रिया शिंदे यांचा डॉक्टर अपर्णा धोटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वप्रथम पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना व गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आता तुमची समाजाप्रती जबाबदारी वाढली त्याकरिता अथक परिश्रम करणे आवश्यक आहे तसेच त्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मोलाचे स्थान आहे त्यामुळे विद्यार्थी घडतो, प्रगती करतो व आपल्या पायावर उभा राहण्यास मदत होते तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनीची संख्या लक्षात घेता आज सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाबद्दल चे स्वप्न पूर्ण होताना दिसते तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणामुळे देशाचे चांगले नागरिक होण्यास मदत होते असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाकरिता सर्व पदवी प्राप्त विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आपल्या पालकासहित उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ अपर्णा धोटे प्रा डॉ राजेश हजारे प्रा डा पी. एन. नासरे व प्रा डॉक्टर किरण जुमडे जुमडे तर आभार प्रदर्शन प्रा डॉ अपर्णा धोटे यांनी केले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा नरेंद्र हरणे, डॉक्टर गजेंद्र बेदरे, डॉक्टर शशिकांत शित्रे, प्रा डॉ नथू वाढवे, प्रा प्रवीण कुमार नासरे, प्रा डॉक्टर न्राजेश हजारे, प्रा सचिन श्रीराम, प्राध्यापक डॉक्टर अजय दहेगावकर, प्रा कुलदीप भोंगळे, डॉक्टर खादरी, प्रा संदीप प्रधान, श्री किशोर भोयर, सौ सुकेशनी भावसागर, श्री विशाल गोरकार, श्री विजय मदनकर, श्री शरद भावरकर, श्री पांडुरंग आखतकर, श्री प्रमोद तेलंग, श्री खुशाल मानकर तसेच एन.सी.सी. चे सर्व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".