बल्लारपुर (का.प्र.) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चंद्रपूर युवक जिल्हाध्यक्षपदी इंजि.राकेश सोमाणी यांची नियुक्ती झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी कुणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता होती. या गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवार (ता.०७) चंद्रपूर येथे ही निवड जाहीर केली.
चंद्रपूर येथे कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्या सह श्री. तटकरे यांनी नियुक्तीपत्र दिले. या मेळाव्या मध्ये युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण,महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली ताई चाकनकर,चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भटारकर,चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष राजीव ककड आदी उपस्थित होते.