शिवसेनेचा दिपोत्सव जल्लोषात संपन्न .!

विरार शहरात छत्रपती शिवरायांच्या जयघोष करत शिवसेनेचा दिपोत्सव जल्लोषात संपन्न .!

विरार (जगदीश काशिकर) : शिवसेना मनवेलपाडा विभाग शाखेच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात संपन्न झाला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख श्री.पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विरार शहरातील मनवेलपाडा तलाव येथे २० x २० फुटाचा पणतीचा दिवा स्वस्तिक मध्ये उभारून तसेच 90 फीट रोडवरील गार्डन मध्ये दिवे लावून व त्यानंतर कारगिल नगर रिक्षा स्टॅन्ड शेजारी असलेल्या महानगरपालिकेच्या सुशोभित जागेवर दिप प्रज्वलित करून अशा विविध ठिकाणी शिवसेना विरार शहरप्रमुख श्री.उदय अरुण जाधव यांच्या हस्ते पहिला दिवा लावत फटाक्यांची आताषबाजी करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
शिवसेना उपशहरप्रमुख श्री.तुकाराम भुवड, महिला उपशहर संघटक सौ.रोशनी रा.जाधव व शाखाप्रमुख श्री.प्रितम रावराणे यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शहर कार्यालय प्रमुख श्री.सुनील चव्हाण, महिला आघाडीच्या सौ.साक्षी उ.जाधव, शाखाप्रमुख श्री.संजय चव्हाण, चंद्रकांत सावंत, महिला शाखा संघटक सौ.स्नेहा चव्हाण, सौ.सुनीता मुळे, उपशाखाप्रमुख श्री.दिनेश खळे, विकास राणे, प्रदीप मोरे, दिपक जोगळे, उपशाखा संघटक सौ.मंगल गायकवाड, सौ.रूपाली रावराणे, सौ.प्रमिला तिवारी, मनवेलपाडा कार्यालय प्रमुख श्री.अशोक माने, गटप्रमुख श्री.प्रकाश यादव, मनोज तिवारी, राकेश रांगळे, योगेश घाणेकर, विनोद मासे, राजेश वाघरे, युवासेनेचे रोहित कदम, दिलीप पाचांगणे, आकाश मुळे, दुर्वेश देसाई, आदि शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवरायांचा जयघोष करत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.




Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.