युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महिला विदर्भ कार्याध्यक्षपदी चंद्रपूरच्या माधुरी कटकोजवार यांची नियुक्ती .!
चंद्रपूर (वि.प्र.) : समाजातील प्रत्येक घटकांचं घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणा-या नोंदणीकृत युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला विदर्भ कार्याध्यक्षपदी चंद्रपूर येथील सुपरिचित जर्नालिस्ट माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ) यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेशभाऊ कचकलवार यांनी जाहीर केली असुन सदर नियुक्तीचे पत्र सुध्दा पाठविले.
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नवनियुक्त विदर्भ महिला कार्याध्यक्षा माधुरी कटकोजवार यांनी पत्रकारीतेची मास्टर डिग्री उत्तीर्ण केली असुन हिंदी विषयात डबल एम.ए.करीत गोल्ड मेडल मिळविलेले आहे. माधुरीताईंच्या या महत्वपूर्ण नव्या नियुक्तीबद्दल चंद्रपूर व परिसरातील त्यांच्या मित्रवर्गातुन अभिनंदनाचा वर्षाव होत असुन राष्ट्रीय अध्यक्ष कचकलवार यांच्या प्रती आभार व्यक्त केले आहे.