संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा.!

रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे सविंधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा.!

बल्लारपूर (का.प्र.) : शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथील रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस, 14 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्याच प्रमाणे या वर्षी सुध्दा 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिना निमित्त विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला होता या वेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे संस्थापक व अध्यक्ष सौ. सुमनताई पुरूषोत्तम कळसकर, झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन जयंत कळसकर,हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भिम आर्मी बल्लारपूर चे शहर अध्यक्ष शशिकांत निरांजने, ॲड मेघा ताई भाले, दिपक पडवेकर, बबलू करमरकर हे उपस्थित होते. या वेळी हा यशस्वी करण्यासाठी रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष सौ. सुमन पुरूषोत्तम कळसकर, सचिव प्राची प्रदीप झामरे, रतन बांबोळे, अशोक मेश्राम, नागेश रत्नपारखी, पुरूषोत्तम कळसकर, प्रदीप झामरे, ॲड. सुमित आमटे, प्रेम नगराळे, आदर्श मेश्राम, शुभांगी बांबोळे, डेशी थाॅमस, शांन्टु थाॅमस शाहिन शेख, सविता जावादे, शोभा अलोने,माया पडवेकर, मंजुताई नरांजे, सिमरन खोब्रागडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.