बल्लारपुर (का.प्र.) : श्री.महेशदादा इंगवले युवा मंच खडकवासला विधानसभा ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री.महेशदादा इंगवले यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांनी कु.सारिका पिसाळ हिला डिप्लोमा मॅन्युफॅक्चरिंग एक्सनेल (DME) पदवीसाठी 40 किलोमिटर दूर आळंदी जवळील डुडुळ गाव जिल्हा पुणे येथे शैक्षणिक साहित्यांची मदत देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत कुदळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल पुणे शहर कार्याध्यक्ष श्री रुपेश भाऊ आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री.महेशदादा इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष ऋषिकेशजी मिसाळ व कु.श्रीकांत इंगवले उपस्थित होते.