नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.!
बल्लारपुर (का.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबन क्लब व शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रमुख पाहुणे श्री भडके, आयसीटीसी, शासकीय ग्रामीण रुग्णालय, भद्रावती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ गजेंद्र बेदरे व विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. सौ. अपर्णा धोटे हे मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे यांनी केले त्यामध्ये या कार्यक्रमाच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री भडके यांनी आपल्या भाषणांमधून चंद्रपूर जिल्ह्यात एड्स कशा प्रकारे पसरत आहे तसेच याविषयी जनजागृती करणे कसे आवश्यक आहे याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी भूमी बेहरे व संकीसा हिवाळे या विद्यार्थिनींनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एड्स मुळे होणारे धोके व एड्स पासून बचाव करण्याकरता घ्यावयाची काळजी याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विभाग विद्यार्थी विकास विभाग चे समन्वयक डॉ सौ अपर्णा धोटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. किरण जुमडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता प्राध्यापक कुलदीप भोंगळे व प्राध्यापक सचिन श्रीरामे यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.