विभाग स्तरावर तिन खेळाडूंना गोल्ड मेडल व एक कान्स पदक .!

राज्यस्तरीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेसाठी शिंदे विद्यालय भद्रावतीच्या तीन खेळाडूंची निवड.!

बल्लारपुर (का.प्र.) : नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे झालेल्या नागपूर विभाग नागपूर विभागीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया भद्रावतीच्या विविध वयोगटात चार विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन दाखविले . त्यातील तीन खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेत ते नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भद्रावती शहरासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
जिल्हास्तरीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेत विविध वयोगटात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या चार खेळाडूंची निवड झाली . त्यांनी गोंदिया येथे झालेल्या विभाग स्तरीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कार्तिक खेमस्कर या खेळाडूने ४८-५१ वजन गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत गोल्ड मेडल प्राप्त केला व राज्यस्तरीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेत त्याची निवड झाली. १९ वर्षाखालील मुलींमध्ये अनुष्का काळे हिने ५९-६३ वयोगटात गोल्ड मेडल प्राप्त केले असून राज्यस्तरीय तायकांडो क्रीडा स्पर्धेत तिची निवड झाली. १४ वर्षे वयोगटातील यश टेकाम या खेळाडूने ३८-४१ वजनगटात गोल्ड मेडल प्राप्त करून राज्य स्तरीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेत निवड झाली. तर आशिष देऊकर याने १७ वर्षे वयोगटात ५१-५५ वजन गटात कांस्यपदक प्राप्त केले.
आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत विभाग स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त केलेल्या व राज्यस्तरावर तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे , सहसचिव तथा तायक्वांन्दो असोसिएशन चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , रमेश चव्हाण, किशोर ढोक, डॉ ज्ञानेश हटवार, सतीश खेमस्कर सचिव तायक्वांदो असोसिएशन चंद्रपूर, डॉ प्रशांत पाठक, माधव केंद्रे, शुभम सोयाम, रवी देऊकर तसेच समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
भद्रावती शहरात तायक्वांन्दो क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे भद्रावतीतील क्रीडा प्रेमी अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".