पोलीसांना न्यायालयाची चपराक, बिल्डरवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल.!

मुंबई (जगदीश काशिकर) : इमारतीत फ्लॅट देण्याचे कबूल करून,आगाऊ पैसे घेऊन साठेकरार करणाऱ्या आणि नंतर तोच फ्लॅट दुसर्‍याच माणसाला खोट्या दस्तऐवजांच्या मदतीने विकून ग्राहकाला फसवणाऱ्या मालेवाडकर नावाच्या बिल्डरवर आर्थिक फसवणुकीसह बनावट दस्तऐवज बनविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
आश्चर्य म्हणजे पोलीस हे प्रकरण दिवाणी असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यात हलगर्जीपणा करीत होते आणि आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक महिने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करीत असल्याने मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे कायदेशीर सल्लागार श्री अमित सरगर (फोन 9082403681) यांच्याकडे हे प्रकरण अखेर सोपविण्यात आले.
फिर्यादीतर्फे हा खटला चालविणारे त्यांचे सहकारी मित्र आणि वकील श्री मंगेश नाईक (फोन 7738841670) यांनी लबाड बिल्डरविरोधात यशस्वीपणे फिर्यादीची बाजू मांडून हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त केले.
या प्रकरणात फिर्यादी प्रत्यक्षात उपस्थित नसतानाच त्याच्या फोटो व सहीसह निबंधक कार्यालयात दस्ताची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, महाराष्ट्रात अशाप्रकारे किती दस्त कोणकोणत्या कार्यालयांतून नोंदवले गेले असतील आणि किती लोकांची कशी फसवणूक झाली असेल हा एक संशोधनाचा विषय असल्याची प्रतिक्रिया ॲड. मंगेश नाईक यांनी आमच्याशी बोलताना दिली.
या प्रकरणामुळे आर्थिक गुन्ह्यात दिवाणी प्रकरण म्हणून निकाल लावणाऱ्या आणि फिर्यादींची दिशाभूल करणाऱ्या पोलीसांना खरी चपराक बसली आहे. मुक्त पत्रकार संघाने या प्रकरणात सुरूवातीपासून पाठपुरावा केल्याने फिर्यादीला योग्य दिशा मिळून न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात यशस्वी कार्यवाही करणाऱ्या दोन्ही वकील सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन...!!!

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.