बल्लारपूर (का.प्र.) : आज पासून डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टीवल ची सुरुवात होत आहे. हया दोन दिवसीय फेस्टीवल मधे आज दिनांक 26 दिसंबर रोजी सकाळी 10 ते 5 पर्यंत विविध देशातून आलेल्या फॉरेन व इंडियन असे एकूण 40 शॉर्ट फिल्म्स हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे दाखवण्यात येतील. तरी सर्व संबंधित रसिक जणांनी उपस्थित राहावे.
त्याच प्रमाणे उद्या दिनांक 27 दिसंबर रोजी दरवर्षी प्रमाणे सायंकाळी 4 वाजता मुख्य समारोह राहील त्यात फेस्टीवल मध्ये 15 FINALIST FILMS दाखविण्यात येतील. विशेष म्हणजे त्यात सौ.अलका कुबल यांना जीवगौरव पुरस्काांनी सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व फिल्म मेकर व रसिक जणांनी हजर राहावे. अशी डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टीवल,अकोला कमिटीने आग्रह केले आहे.