केंद्र सरकारशी संबंधित आस्थापनेला मनकासे चा दणका.!

मुंबई (जगदीश काशिकर) : मे.पेटंट आणि ट्रेड मार्क (मुंबई) या केंद्र सरकारच्या प्रकल्पाशी संबधित असलेल्या कंपनीने गेल्या १४ वर्षापासून काम करत असलेल्या सुमारे ४० कामगारांना ०६ महिण्याआधी कुठलेली कारण न देता अचानकपणे बेकायदेशीररीत्या कामावरून काढले.सदर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांच्याशी संपर्क करून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.सदरील कामगारांचा विषय समजावून घेवून मे.पेटंट आणि ट्रेड मार्क कंपनी व्यवस्थापनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला व चर्चेसाठी वेळ मागितला.
परंतु सदरील कंपनी चर्चेसाठी गेली ०६ महिने पोलीस प्रशासनाला पुढे करून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची दिशाभूल व टाळाटाळ करत राहीली.लातो के भूत बातोसे नही मानते या प्रमाणे मनसे स्टाईल दाखवल्यानंतर व्यवस्थापन चर्चा करण्यास तयार झाले.सदरील चर्चे अंती व्यवस्थापनाने कामगारांना त्यांची १४ वर्षापासून चे कायदेशीर देणी(ग्र्याजूएटी,पगारी रजा) व गेल्या ०६ महिन्यांपासून जे थकीत वेतन बाकी होत ते देण्याचे मान्य केले.व्यवस्थापनासोबत चर्चा करतेवेळी स्थानिक विभाग अध्यक्ष आनंद कांबळे,शाखा अध्यक्ष गणेश हिवलकर, बजरंग देशमुख तसेच इतर पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.