जरांगे पाटील यांना नवी मुंबई आवारात असेपर्यंत विशेष सुरक्षा दया व सरकार विरुद्ध काही राष्ट्र विघातक शक्ती या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता आहे - महाराष्ट्र करणी सेना
मुंबई (जगदीश काशिकर) : दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी नवी मुंबई आवारात मराठा समाज समाजाचा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांचा नेतृत्वाखाली येत आहे. काही राष्ट्र विघातक शक्ति जी रात्रंदिवस बीजेपी विरोधात कार्य करणारी मंडळी या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून सूचित केले की केंद्र शासनाची विशेष सुरक्षेला यंत्रणा बोलवण्यात यावी.
मराठा समाज हा शांतता प्रिय असल्याने तो शांतता मार्गाने आंदोलन करणार आहे. चेंगराचेंगरी होऊ नये, अफवा पसरू नये यावर सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.कुणी जरांगे पाटील यांच्यावर हमला कोणी करू नये याची सुद्धा दक्षता घेणे फार जरुरी आहे असे ते म्हणाले.